Home पिंपरी चिंचवड बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांना मनोवादी संबोधित करणार्या समाजकंटक नरेंद्र बनसोडेंचा जाहीर निषेध:- युवराज दाखले

बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांना मनोवादी संबोधित करणार्या समाजकंटक नरेंद्र बनसोडेंचा जाहीर निषेध:- युवराज दाखले

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी -प्रतिनीधी, बहुजन समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी विधानपरिषद आमदार अमित गोरखे व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांचे वंशज सचिन भाऊ साठे यांच्या वर पिंपरी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरती घेतलेल्या आरक्षण वर्गीकरण विरोधी समाजकंटक कपिल सरोदे, सुरेश निकाळजे, नरेंद्र बनसोडे, पानपट्टी यांनी आयोजित केलेल्या समाज कंटक बैठकीत स्वयंघोषित काँग्रेस नेता नरेंद्र बनसोडे यांनी विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांना मनोवादी संबोधित केले.

हिंदू मातंग सेना व शिवशाही शासन पक्ष यांच्या वतीने या समाज कंटकांचा जाहीर निषेध करून संत तुकाराम पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांना लेखी तक्रार देऊन तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नेते नामदेव रिट्टे, शंकर (नाना) कांबळे, क्रांतिवीर विचार मंच संस्थापक अध्यक्ष अविनाश शिंदे,शिवशाही माथाडी कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष सचिन दोनगहू, प्रदेश अपाध्य मंगेश डाखोरे, सचिव सुरज आण्णा कांबळे, पत्रकार माणिक पौळ, शिवशाही महीला आघाडी प्रदेश अध्यक्षा उषामाई कांबळे, ऋषिकेश वाघमारे, सोशल मीडिया अध्यक्ष आकाश घोलप, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजी खडसे,शिवशाही वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनिल तांबे, भिमराव कांबळे, सन्नी गवई, मातंग समाजाचे युवा नेते चंद्रकांत दादा लोंढे, हिंदू मातंग सेना संस्थापक अध्यक्ष अरूण जोगदंड, सचिव संजय ससाणे, खजिनदार हनुमंत उर्फ नाना कसबे, अविनाश गायकवाड,शिवशाही शासन पक्ष संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे आदी प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00