Home पिंपरी चिंचवड जाधववस्ती बोगस एस आर ए प्रकरणी अण्णा बोदडे, आर के डेव्हलपर्स, ग्रेस डेव्हलपर्स आणि वाडकर पाटील असोसिएट यांच्यावर कारवाई करा : मच्छिंद्र तापकीर    

जाधववस्ती बोगस एस आर ए प्रकरणी अण्णा बोदडे, आर के डेव्हलपर्स, ग्रेस डेव्हलपर्स आणि वाडकर पाटील असोसिएट यांच्यावर कारवाई करा : मच्छिंद्र तापकीर    

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत येथील सर्वे नं. १९४/१ , १९४/२ १९५,१९६ प्लॉ नं. १९१ ते २०९ तसेच प्लॉ नं. २१० ते २१६, तसेच २१७ ते २५८ जाधव वस्ती येथे झोपडपट्टी नसताना गलीच्छ वस्ती असा झोपडपट्टी सदृश्य अहवाल देणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोनिपू विभागाचे सक्षम प्राधिकारी उपायुक्त अणा बोदडे आणि झोपडपट्टी नसताना एस आर ए साठी प्रस्ताव दाखल करणारे में. आर के डेव्हलपर्स में, वाकडकर पाटील असोसिएट आणि मे. ग्रेस डेव्हलपर्स यांनी सुमारे २००० कोटी रुपयांचा टिडीआर लाटण्यासाठी सरकारची दिशाभूल केली आहे त्यामुळे या बिल्डरवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी व सदरचा बोगस प्रकल्प रद्द करावा,अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधीपक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,पि एम आर डि एक चे आयुक्त योगेश म्हसे,एस आर ए चे कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रावेत जाधव वस्ती येथे स्थानिक गाववाले जाधव यांची घरे आहेत. तेथे झोपडपट्टी नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेने २००० साली मशाल संस्थेमार्फत करण्यात आलेल्या शहरातील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणात कोठेही समावेश नाही तसेच २०१९ मध्ये ही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कॅनबेरी संस्थेच्या मार्फत करण्यात आलेल्या झोपडपट्टी सर्वेक्षणात ही रावेत येथील जाधव वस्ती झोपडप‌ट्टी नसल्यामुळे त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. जाधव वस्ती येथे सुमारे बारा एकर जागेवर एस आर ए प्रकल्पातून मिळणाऱ्या १५०० ते २००० कोटीच्या टी डी आर वर बिल्डरचा डोळा आहे.

रावेत येथील जाधव वस्ती ही पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण स्थापना होण्याआधी पासून स्थानिक मागासवर्गीय गाववाले जाधव यांची वडिलोपार्जित जागा असून त्यावर जाधव कुटूंबीयांची स्वतः ची दोन दोन हजार स्क्वेअर फुटाची घरे आहेत. सदर सर्व्हे नं १९४/१ १९४/२, १९५, १९६ सदर जागा ही पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने काही ठिकाणी अधिग्रहित केली आहे. त्यामध्ये ओपन स्पेस, व काही प्रमाणात प्लॉटिंग केले आहे. अधिग्रहणाबाबतचा वाद अद्यापही चालू आहे. तरी सुध्दा एस. आर. प्रकल्पातून मिळणाऱ्या टी डी आर मधून अंदाजे १५०० ते २००० करोड रुपयांचा मलिदा खाण्याचा घाट बिल्डरने आणि शहरातील काही राजकीय पुढाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी घातला आहे. सदर प्रकल्पाला तेथील स्थानिक रहिवाशांनी प्रथम पासूनच विरोध दर्शविला आहे. त्या भागातील रेडीरेकनर चा दर हा सहा हजार शंभर रुपये असून एका घरामागे बिल्डरला सुमारे चाळीस ते पन्नास लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळेच झोपडंपट्टी नसताना एस आर ए चा घाट बिल्डरने घातला आहे. सध्या एस आर ए प्रकल्प राबविणारा एक बिल्डर काही वर्षांपूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयातील वकीलाच्या हाताखाली एजंट चे काम करत होता,आज तो हजारो कोटी रुपयांचा मालक झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे भोसरी येथील पक्षप्रवेशाच्या वेळी आले असताना ते बोलले होते पिंपरी-चिंचवडमध्ये एस आर ए प्रकल्प मोठया प्रमाणात सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एस आर ए साठी एकत्र आलेले आहेत. तसेच जेथे झोपडपट्टी नाही अशा ठिकाणीही सक्षम प्राधिकारी पिंपरी- चिंचवड यांना हाताशी धरून एस आर ए करण्याचा घाट घालत जात आहे बहुदा ते रावेत येथील जाधववस्ती बद्दल बोलत असावेत.

banner

रावेत येथील जाधव वस्ती येथे झोपडपट्टी नसताना स्थानिक रहिवाशांना अंधारात ठेवून तेथे राहत नसलेल्या नागरिकांचे संमती पत्र भरुन बिल्डरने महापालिकेचे झोनिपू विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि एस आर ए संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी हात मिळवणी करून सरकारची दिशाभूल करून प्रकल्प मंजूर करण्याचा घाट घातला आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिचे संबंधित सक्षम प्राधिकारी उपायुक्त अण्णा बोदडे , संबंधित अभियंते,बीट निरिक्षक यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच झोपडपट्टी नसताना दिशाभूल करुन एस आर ए चा प्रस्ताव दाखल करुन टि डी आर च्या स्वरूपात २००० करोड रुपयांचा आर्थिक घोटाळा करण्याच्या तयारीत असलेले बिल्डर मे.आर के डेव्हलपर्स मे. वाकडकर पाटील असोसिएट. मे. ग्रेस डेव्हलपर यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून एस आर ए ने बिल्डरांना काळ्या यादीत टाकावे तसेच खोटी संमतीपत्र भरून घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, सदरचा रावेत येथील जाधववस्तीचा बोगस एस आर ए प्रकल्प ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी मागणी विरोधीपक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00