Home पिंपरी चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसनातील सदनिका आता पाच वर्षांत हस्तांतरणयोग्य..

झोपडपट्टी पुनर्वसनातील सदनिका आता पाच वर्षांत हस्तांतरणयोग्य..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सदनिकांच्या हस्तांतरण अटींमध्ये मोठी शिथिलता करण्यात आली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दहा वर्षे सदनिका गहाण, तारण किंवा हस्तांतर करता येत नव्हत्या. मात्र आता हेच बंधन केवळ पाच वर्षे राहणार आहे. महापालिकेच्या नव्या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र-राज्य सरकारच्या जेएनएनयुआरएम अभियानातून शहरात अनेक ठिकाणी राबविण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पांतून हजारो कुटुंबांना निवासाची सुविधा देण्यात आली. या सदनिकांवर पूर्वीच्या करारानुसार कोणताही आर्थिक बोजा चढविणे किंवा मालमत्ता हस्तांतर करण्यास दहा वर्षांची सक्ती होती.

राज्य शासनाच्या १९ जानेवारी २०२४ च्या निर्णयानुसार हा कालावधी पाच वर्षांवर आणण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने सदनिका आणि गाळे पाच वर्षांनंतर हस्तांतरण करण्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे.

यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक लवचिकता मिळणार असून पुनर्वसन प्रकल्पातील मालमत्ता व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00