Home पिंपरी चिंचवड शिक्षणाचे प्रणेते,क्रांतिसूर्य महात्मा फुले हे सामाजिक एकात्मता आणि न्याय यासाठी आयुष्यभर कार्यरत असणारे थोर समाजसुधारक – आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर…

शिक्षणाचे प्रणेते,क्रांतिसूर्य महात्मा फुले हे सामाजिक एकात्मता आणि न्याय यासाठी आयुष्यभर कार्यरत असणारे थोर समाजसुधारक – आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२५) :-  स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, सह शहर अभियंता बापू गायकवाड,उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथील महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,या कार्यक्रमास उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,पोलीस प्रशासनाचे राजेंद्र शिंदे,सामाजिक कार्यकर्ते शंकर लोंढे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00