Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरी टोळीचा पर्दाफाश..

पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरी टोळीचा पर्दाफाश..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-०१ वाहनचोरी विरोधी विशेष पथकाने मोठी कारवाई करत सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या पथकाने एकूण १५ लाख रुपये किंमतीच्या ३७ मोटारसायकली आणि २ ऑटो रिक्षा जप्त करून ३४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, परिमंडळ-०१ मध्ये वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. सहा. पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज चेक करत संशयितांची माहिती मिळवली.

पथकाने पिंपरी, भोसरी, सांगवी, निगडी, संत तुकाराम नगर, रावेत यांसह पुणे-मुंबईतील विविध ठिकाणांवरील गुन्हे उघडकीस आणले. पाच आरोपींसह काही विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमध्ये डीसीपी संदिप आटोळे, सहा. पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष पथकातील १५ पेक्षा अधिक अधिकारी-अंमलदारांनी ही संयुक्त मोहीम यशस्वी केली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00