Home पिंपरी चिंचवड भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन….

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन….

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२५) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्य, विचार आणि योगदानाचा गौरव करताना भारतीय संविधानाने देशाला दिलेल्या समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे जतन व अंमलबजावणी करणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच भीमसृष्टी पिंपरी चौक, हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी येथील पुतळ्यास महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता आकाश ठोकळ, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भुक्तर, मुकेश जगताप, शाम सोनवणे तसेच भीमसृष्टी येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्य मारूती भापकर, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, एच. ए. कंपनी येथील कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मिलींद जाधव, संजय केंगले, रविंद्र कांबळे, मधु फलके, रमेश जाधव, सुरेंद्र पासलकर, मारूती लोखंडे, मारूती बोरावके, सुनिल रिकामे उपस्थित होते.

तर दापोडी येथील कार्यक्रमात उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजीव भास्कर, माजी नगरसदस्या माई काटे, चंद्रकांता सोनकांबळे तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00