Home पिंपरी चिंचवड महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपक्रमांची आवश्यकता- योगेश बहल..

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपक्रमांची आवश्यकता- योगेश बहल..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि.११ डिसेंबर २०२५):-  कष्‍टकऱ्यांचे नेते डॉ. बाबासाहेब कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्‍या विविध कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपक्रमांची आवश्यकता असभ्‍याचे मत योगेश बहल यांनी व्‍यक्‍त केले. तर ‘महिलांचे सक्षमीकरण म्हणजे सामाजिक प्रगती’ अशी भावना डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

यावेळी राष्‍ट्रवादीचे शहराध्‍यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते राहूल भोसले, अजित गव्हाणे, डब्बू आसवानी, वैशाली घोडेकर, ज्ञानेश्वर कांबळे, विशाल मासूळकर, राहुल डबाळे, सुवर्णा डंबाळे, मुमताज शेख, संतोष निसगंध, संदिपान झोंबाडे, बळीराम काकडे, प्रल्हाद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब कांबळे म्‍हणाले की, महापालिकेत कष्टकरी जनतेचे प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे. महापालिका निर्णय प्रक्रिया कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींना सभागृहात स्थान मिळाले पाहिजे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर ‘खेळ रंगला पैठणीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठी गर्दी उसळली. लकी ड्रॉमधून निवडलेल्या माधुरी चोपडे, दमयंती जाधव, अरुणाताई आणि साक्षी बनसोडे, यांना पैठणी, सोन्याची नथ, फ्रीज, टीव्ही आदी बक्षिसांचे वाटप करण्‍यात आले. खराळवाडी येथे आयोजित इलेक्ट्रिक टू-व्हीलर चावी वाटप सोहळ्यात अंजली नखाते, पायल वैभव गायकवाड, रूपाली महेंद्र भालेराव आणि संगीता मुद्दल या भाग्यवान महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते इलेक्ट्रिक टू-व्हीलर प्रदान करण्यात आल्या. “महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे,” असे मत बहल यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्‍या आयोजनासाठी आशा बाबासाहेब कांबळे, मधुरा डांगे, मिनू गिल, रेखा भालेराव, विनोद वरखडे, प्रकाश यशवंते आणि शुभम तांदळे यांनी परिश्रम घेतले.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00