Home पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारास सम्यक स्वयं सेवा संस्थेचा जाहीर पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारास सम्यक स्वयं सेवा संस्थेचा जाहीर पाठिंबा

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

 पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारास सम्यक स्वयं सेवा संस्था यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सम्यक स्वयं सेवा संस्था (पिंपरी चिंचवड) यांच्यावतीने काढण्यात आलेल्या जाहीर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, युवक रोजगार, झोपडपट्टी पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत नागरी सुविधा या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची भूमिका ठोस व विकासाभिमुख आहे.

\प्रभाग क्रमांक ९ मधील पाणीपुरवठा, गटारे, रस्ते, वीज, आरोग्य सेवा, बेरोजगारी आणि महिला सुरक्षिततेसारख्या ज्वलंत प्रश्नांवर प्रभावी काम करण्याची क्षमता उमेदवारांकडे असल्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. सम्यक स्वयं सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ बनसोडे यांनी सांगितले की, सदर उमेदवार लोकांशी थेट संवाद साधणारे, स्वच्छ प्रतिमेचे, संघर्षशील व विकासाभिमुख नेतृत्व देणारे आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनासाठी त्यांचा विजय आवश्यक आहे. यावेळी संस्थेने प्रभाग क्रमांक ९ मधील सर्व नागरिकांना जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन विकास व सामाजिक न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00