Home पिंपरी चिंचवड भोसरीत परीक्षेच्या ताणाखाली बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

भोसरीत परीक्षेच्या ताणाखाली बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. 8 फेब्रुवारी २०२६) :- भोसरी परिसरात बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांवरील अभ्यासाच्या ताणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

प्रणय सुनील खेडे (वय १७, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय हा भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या बारावीमध्ये शिक्षण घेत होता.

 

banner

महाविद्यालयातील काही प्रकल्प अपूर्ण राहिल्यामुळे तसेच प्रात्यक्षिक परीक्षेला बसता आले नसल्यामुळे तो काही दिवसांपासून तणावाखाली होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी प्रणय आयडीसाठी राजमाता जिजाऊ महाविद्यालयात परीक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परतला.

 

घटनेच्या वेळी त्याची आई बँकेत कामावर गेली होती, तर वडील गावाला गेले होते. घरात एकटाच असताना प्रणयने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी पोलिसांना दिली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण, पालकांच्या अपेक्षा आणि संवादाचा अभाव या मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ताण जाणवत असल्यास त्यांनी पालक, शिक्षक किंवा समुपदेशकांशी संवाद साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला…

विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा परीक्षेमुळे तणाव जाणवत असल्यास पालकांनी त्यांच्या मानसिक स्थितीची दखल घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाकू नये, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00