Home पिंपरी चिंचवड भाजपच्या सत्तारूढ पक्षनेत्यांना सुटेना अॅटीचेंबर्सचा मोह?…

भाजपच्या सत्तारूढ पक्षनेत्यांना सुटेना अॅटीचेंबर्सचा मोह?…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. १८ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची बहुमतात सत्ता आल्यानंतर महापौर, सत्तारूढ पक्षनेते यांच्या निवडी झाल्या आहेत. शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली असून नागरिकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

भाजपचे महापौर रवी लांडगे आणि विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी नागरिकभिमुख काम करण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा शहरात सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.

मात्र, दुसरीकडे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या कारभाराबाबत महापालिकेत वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

नागरिकांशी थेट संवाद साधण्याऐवजी त्यांना अॅटीचेंबर्सचा मोह सुटत नसल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. विविध भागांतून नागरिक त्यांना भेटण्यासाठी येत असतात. पत्रकारही माहिती घेण्यासाठी येतात; मात्र दीर्घ प्रतीक्षा करूनही भेट न झाल्याने अनेकांना वैतागून परत जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

banner

महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाकडून अधिक सक्रिय आणि खुल्या संवादाची अपेक्षा व्यक्त केली जात असताना  नागरिकांशी थेट संपर्क आणि पारदर्शक कार्यपद्धत यापासून अलिप्त राहणारे सत्तारूढ पक्षनेते यांच्या कामकाजात नक्कीच सुधारणा होण्याची अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00