Home पिंपरी चिंचवड माजी नगरसेवक कैलास बारणे यांना ‘स्वीकृत नगरसेवक’ पदी संधी द्यावी..

माजी नगरसेवक कैलास बारणे यांना ‘स्वीकृत नगरसेवक’ पदी संधी द्यावी..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. 20 फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक कैलास (बाबा) बारणे यांना सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाण येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधून उमेदवारी देताना कैलास बारणे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला. निवडणुकीच्या काळात त्यांनी संपूर्ण पॅनेलचे नेतृत्व करत संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका बजावली.

कैलास बारणे यांना समाजकारणाचा दीर्घ अनुभव असून शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क आहे. २०१७ मधील निवडणुकीत त्यांनी नगरसेवक म्हणून काम करताना विविध विकासकामांमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि शहर विकासाबाबतची तळमळ लक्षात घेता त्यांना पुन्हा सभागृहात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नगरसेवक संदीप वाघेरे, यश साने आणि नगरसेविका माया बारणे यांच्या समर्थनासह हे निवेदन देण्यात आले आहे. स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेत अनुभवी व कार्यक्षम नेतृत्वाला प्राधान्य द्यावे, असा आग्रह  निवेदनातून करण्यात आला आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00