Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा संपन्न….

पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा संपन्न….

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

मोशी येथील जय गणेश लॉनमध्ये अधिक मासानिमित्त महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पूजा लांडगे यांच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या तब्बल 330 हून अधिक ब्राह्मण दांपत्यांचे विधिवत पाद्यपूजन, लक्ष्मी-नारायण पूजन, सन्मान व स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.

वेदमंत्रांच्या मंगलमय घोषात पार पडलेल्या या कार्यक्रमात धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो भाविक सहभागी झाले होते. अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त धर्म, संस्कृती आणि सनातन परंपरांचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “अधिक मास हा आत्मशुद्धी, संस्कार संवर्धन आणि समाजप्रबोधनाचा कालखंड आहे. सनातन संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत.” या सोहळ्यामुळे श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00