पिंपरी चिंचवड : – दिनांक २६/०६/२०२५ रोजी जेसीबी कंपनी नवलाखउंब्रे येथे तळेगाव एमआयडीसी परिक्षेत्रातील विविध नामवंत कंपन्याचे एच. आर. व प्रतिनिधी यांचेशी सुसंवाद साधला. सदर प्रसंगी उपस्थित कंपन्यांचे एच.आर. व प्रतिनिधी यांच्या विविध समस्या समजाऊन घेऊन उपस्थित अधिका-यांच्या मदतीने त्यांच्या समस्यांचे निराकारण केले. उपस्थित कंपनी प्रतिनिधी यांना मार्गदर्शन करताना मा. श्री. विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त यांनी पुढील मुददयांवर लक्ष वेधले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील औदयोगिक तक्रारींचे निवारण करण्याकरीता पिंपरी चिंचवड आयुक्तालयात औदयोगिक तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली असुन सदर कक्षामार्फतीने पोलीस विभागाशी निगडीत औदयोगिक कंपन्यांशी संबधित कंत्राटे, दशहत इत्यादी व समस्या सोडविण्यात येत आहेत, तळेगाव एमआयडीसी मधील औदयोगिक कंपन्या यांनी चांगल्या प्रकारचे सी.सी.टी.व्ही कॅमरे समाज उपयोगाच्या अनुषंगाने आवश्यक त्या ठिकाणी बसविण्यात यावे, कंपनी कामगार यांचे रस्त्यावरील अपघातामध्ये होणारी हानी टाळण्याकरीता प्रत्येक कंपनी व्यवस्थापनाने त्यांचे कामगारांना हेल्मेट वापरणेबाबत पुढाकार घ्यावा, कंपनीचे कामगारांना ट्रॅफिकची समस्या येऊ नये याकरीता विविध कंपन्यानी समन्वय ठेऊन वेळेचे वेगवेगळे नियोजन करावे. कंपनीचे कामगारांना सुरक्षतेबाबत लवकरात लवकर मदत मिळणेकरीता त्यांनी डायल ११२ या क्रमांकावर संपर्क करुन मदत घ्यावी, कंपनी व्यवस्थापनाने त्यांचेकडे येणारे ट्रक, ट्रेलर हे रोडवर लागणार नाहीत त्यांना कंपनीचे आतील परीसरात शक्य असल्यास जागा उपलब्ध करुन दयावी. कंपनी व्यवस्थापनाची काही तक्रार असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार दयावी पोलीस विभागाकडुन त्यांना तात्काळ मदत मिळुन गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले व औदयोगिक क्षेत्रातील वातावरण हे भयमुक्त ठेवण्यात येईल असे सांगितले. सदर संवादामध्ये जेसीबी, हुदाई, एल अॅण्ड टी, शेफलर, पोस्को, हावमोर, इमरसन, तसेच इतर कंपन्याचे संवादास सुमारे ५५ ते ६० एच.आर व प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये कंपन्याचे प्रतिनिधी तसेच (१) श्री. विशाल गायकवाड, पोलीस उपआयुक्त परीमंडळ २, पिंपरी चिंचवड (२) श्री. बापु बांगर, पोलीस उप आयुक्त, वाहतुक विभाग (३) डॉ. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, इंडस्ट्रियल ग्रिव्हियन्स सेल तथा गुन्हे शाखा (४) श्री. जयप्रकाश सागरे उप अभियंता एमएसईबी तळेगाव विभाग (५) श्री. प्रशांत पवार सहा अभियंता एमएसईबी इंदोरी विभाग (६) श्री. राजेश धोत्रे सहा अभियंता एमआयडीसी हे हजर होते. तसेच श्री. रणजित जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, असे हजर होते. श्री. बापु बांगर, पोलीस उप आयुक्त वाहतुक विभाग यांनी सर्वांचे आभार मानुन सदर संवादाची सांगता केली. तसेच सदर कार्यक्रम झालेनंतर मा. पोलीस आयुक्त साो, यांनी हुंदाई कंपनी नवलाखउंब्रे येथे भेट देऊन हुंदाई कंपनी प्लॅन्ट हेड शाम सिंग यांचेकडुन कंपनी बाबत सर्व माहीती घेतली व कंपनी सुरक्षतेबाबत काही सुचना दिल्या
26