Home पिंपरी चिंचवड बालगुन्हेगारी वाढीवर आमदार अमित गोरखे यांनी प्रश्न उपस्थित करत लक्ष वेधले; सोशल मीडियाच्या गैरवापराला आळा घालण्याची मागणी

बालगुन्हेगारी वाढीवर आमदार अमित गोरखे यांनी प्रश्न उपस्थित करत लक्ष वेधले; सोशल मीडियाच्या गैरवापराला आळा घालण्याची मागणी

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

मुंबई :- राज्यभरात अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींविषयी विधानपरिषदेत आवाज उठवत, भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी या चिंताजनक विषयावर शासनाचे लक्ष वेधले. पुणे शहरासह राज्यातील अनेक भागांत अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असून, सोशल मीडियाच्या अनियंत्रित प्रभावामुळे ही समस्या अधिक तीव्र होत आहे, असे त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडले.

अमित गोरखे म्हणाले की, गुन्हेगारी रील्स, हिंसक स्टेटस आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या व्हिडिओंमुळे अनेक अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी प्रसिद्धी वाटू लागली आहे. शिक्षण, क्रीडा आणि संस्कार यासाठीचं वय असताना ही मुले चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.” त्यांनी अधोरेखित केलं की, गुन्हेगारीला ‘स्टाईल’ किंवा ‘शौर्य’ समजून मुलं त्याकडे आकृष्ट होत आहेत. यामागे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंचा मोठा वाटा आहे.

पिंपरी-चिंचवडमधील ६० पेक्षा जास्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागांत ही प्रवृत्ती जास्त तीव्रतेने जाणवते. बाल न्याय कायद्याचा गैरफायदा घेत गुन्हेगार अल्पवयीन मुलांचा वापर करतात. यासोबतच, काही सराईत गुन्हेगार ‘मोहरा’ म्हणून अल्पवयीन मुलांचा वापर करत आहेत, याकडेही गोरखे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

बाल न्याय (बालकांचे संरक्षण) कायदा, 2015 नुसार अशा अल्पवयीन मुलांवर सौम्य कारवाईच होत असल्यामुळे उदा. बाल सुधारगृहात ठेवून नंतर मुक्त करणे  या कायद्यातील पळवाटा गुन्हेगारांना मदत करणाऱ्या ठरत आहेत. गोरखे यांनी नमूद केले की, “गुन्ह्याच्या योजनांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करून काही गुन्हेगार शिक्षा टाळत आहेत. त्यामुळे या मुलांचं आयुष्य पणाला लागण्याची शक्यता वाढली आहे. हे थांबवण्यासाठी कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.”

banner

राज्यव्यापी समस्या, स्थानिक नाही

पिंपरी-चिंचवडमध्येच मागील महिन्यात आठपेक्षा जास्त गुन्हे  मारामारी, चोरी, लुटमार यांसारखे  शुल्लक कारणांवरून घडले. गोरखे यांनी स्पष्ट केलं की, ही समस्या केवळ त्यांच्या मतदारसंघापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यातच ही स्थिती गंभीर आहे.

शासनाने तातडीने पावले उचलावीत – गोरखे यांची आग्रही मागणी

“गुन्हेगारीचं उदात्तीकरण रोखण्यासाठी सोशल मीडियावर नियंत्रण आवश्यक आहे. शिक्षण, कौशल्यविकास, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना सकारात्मक पर्याय देणं अत्यावश्यक आहे,” असे आमदार अमित गोरखे यांनी ठामपणे सांगितले. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून वाचवण्यासाठी आणि या समस्या मुळापासून सोडवण्यासाठी शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असून, बाल न्याय कायद्याच्या पळवाटा दूर करून त्याला अधिक परिणामकारक बनवणे,
तसेच सोशल मीडियावर नियंत्रण आणणे, ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00