Home पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक जवानांमुळे मुक्या जीवाला मिळाले जीवनदान!

महापालिकेच्या अग्निशामक जवानांमुळे मुक्या जीवाला मिळाले जीवनदान!

४० फूट खोल खड्ड्यात पडलेल्या गायीचा वाचवला जीव

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी,  : रावेत गावठाण बीआरटीजवळील शाळेसमोरील कन्स्ट्रक्शन साईटवरील खोल खड्ड्यात पडलेल्या गायीला सुखरूप बाहेर काढून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक जवानांनी मुक्या जीवाला जीवनदान दिले आहे. ही कामगिरी पिंपरी, थेरगाव व प्राधिकरण अग्निशमन केंद्रांच्या बचाव पथकाने पार पाडली. रावेत गावठाण बीआरटीजवळील शाळेसमोरील कन्स्ट्रक्शन साईटवरील खोल खड्ड्यात एक गाय पडली आहे, अशी माहिती मिळताच पिंपरी, थेरगाव व प्राधिकरण अग्निशमन केंद्रांमधून बचाव पथक तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, सदर खड्डा अंदाजे ५०x५० फूट लांबीचा आणि ३५ ते ४० फूट खोल होता. पावसामुळे संपूर्ण भाग चिखलमय झालेला होता. अशा कठीण परिस्थितीत खड्ड्याच्या निसरड्या व चिखलयुक्त परिसरामुळे क्रेन थेट खड्ड्याजवळ नेणे शक्य नव्हते. मात्र क्रेनच्या बूमचा वापर करून व होज आणि दोराच्या साहाय्याने अग्निशामक जवानांनी गायीला दोन बेल्ट लावले. साधारण अर्धा तासाच्या प्रयत्नांनंतर गायीला सुरक्षितरित्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. सहआयुक्त तथा अग्निशमन विभागप्रमुख मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले व लिडिंग फायरमन सारंग मंगळूरकर, फायरमन काशिनाथ ठाकरे, सौरव इंगवले, अजय कटारनवरे, विकास पांढरे, विवेक वाघमोडे, शुभम जगताप आणि ऋषिकेश सावंत यांनी केली. …… कोट आमचे जवान हे आमच्या विभागाचे खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहेत. अशा मोहिमा केवळ प्रशिक्षणाने नव्हे, तर मनातली दया आणि बांधिलकीने पूर्ण होतात. एखाद्या माणसाच्या जीवाबाबत जितकी तत्परता आमचे जवान दाखवतात, तितकीच संवेदना मुक्या जीवांबाबतही दाखवणे यातूनच अग्निशमन विभागातील जवानांचा सेवाभाव दिसून येतो. — मनोज लोणकर, सहआयुक्त तथा अग्निशमन विभागप्रमुख, पिंपरी चिंचवड महापालिका ….. कोट ही कामगिरी फक्त तांत्रिक कौशल्याने नाही, तर जवानांच्या संवेदनशीलतेने व सेवाभावाने शक्य झाली. ४० फूट खोल खड्डा, अंधार आणि चिखल अशा अत्यंत कठीण परिस्थितीत देखील जवानांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. शहरातील नागरिकांसोबतच मुक्या जीवांचं रक्षण करणं, ही आमची जबाबदारीच नव्हे तर आमचं कर्तव्य आहे. — ऋषिकांत चिपाडे, उपअग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00