Home पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टी कडून शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला!

आम आदमी पार्टी कडून शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला!

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

 पिंपरी,  — आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आज पिंपळे निलख येथील मुख्य बसस्थानक येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अजित फाटके पाटील (प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आम आदमी पार्टी महाराष्ट्र) यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमामध्ये रविराज काळे यांनी कै. नारायण शंकर घोडके यांच्या स्मरणार्थ १०वी व १२वी उत्तीर्ण मुलांकरिता महात्मा जोतिबा फुले स्कॉलरशिप (७,०००/- रु.), मुक्ताबाई रामचंद्र बालवडकर यांच्या स्मरणार्थ १०वी व १२वी उत्तीर्ण मुलींसाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप (७,०००/- रु.), आणि पिंपरी चिंचवड शहरातील १०वी व १२वी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आम आदमी पार्टी विशेष स्कॉलरशिप (११,०००/- रु.) या शिष्यवृत्ती जाहीर केल्या. यावेळी श्री. अजित फाटके पाटील यांनी बोलताना शहराध्यक्ष श्री. रविराज काळे व आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड यांचे विशेष कौतुक केले.

रविराज काळे यांनी पिंपळे निलख परिसरात केलेल्या नवनवीन उपक्रमांमुळे परिसराचा कायापालट झाला असून आम्हाला त्यांचा अभिमान आहे अश्या शब्दांत त्यांनी गौरवोद्गार काढले. ज्या ज्या अंगणवाडी व शाळांमध्ये रविराज काळे यांनी उपक्रम राबवले त्या त्या शाळांतील शिक्षक-शिक्षिकांनी मनोगत व्यक्त करत आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सकारात्मक पाऊल टाकत, आम आदमी पार्टीने गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य प्रदान करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच विविध क्षेत्रात उत्तम यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष श्री. रविराज बबन काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमास पक्षाचे वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, यल्लाप्पा वालदोर, पुणे शहर युवक शहराध्यक्ष अमित मस्के, दत्तात्रेय काळजे, चंद्रमणी जावळे, सुनील शिवशरण, शुभम यादव, अजय सिंग इत्यादी पदाधिकारी,पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

banner

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00