Home पिंपरी चिंचवड नवीन नोटरी वकिलांना नवी मुंबईत मार्गदर्शन; महाराष्ट्र ॲण्ड गोवा नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षांची उपस्थिती

नवीन नोटरी वकिलांना नवी मुंबईत मार्गदर्शन; महाराष्ट्र ॲण्ड गोवा नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षांची उपस्थिती

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

नवी मुंबई: नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनने नुकत्याच आयोजित केलेल्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात नवीन नोटरी वकिलांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र ॲण्ड गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष, मा. श्री. ॲड. सय्यद सिकंदर अली साहेब आणि नोटरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे प्रवक्ते, मा. श्री. ॲड. शंकरराव वानखेडे यांनी उपस्थित राहून नव नियुक्त नोटरींना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात नवी मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष, मा. श्री. ॲड. सुनील निहलीनाथ मोकल साहेब, उपाध्यक्ष ॲड. संदीप भास्कर रामकरण, सचिव ॲड. विकास गस दगडू म्हात्रे, खजिनदार ॲड. तुषार प्रभाकर राऊत, सहसचिव ॲड. संजय मनोहर म्हात्रे आणि महिला सहसचिव ॲड. हेमोगी आकाश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यात सदस्य ॲड. समित चिंतामण राऊत, ॲड. दत्तात्रय नामदेव जगताप, ॲड. अजिंक्य सुरेश गाणे, मा. श्री. निलेश देविदास पाटील, मा. श्री. अरविंद चांद्रा आणि ॲड. डिंपल यांचा समावेश होता.

याव्यतिरिक्त, नवी मुंबई नोटरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. ॲड. समित राऊत आणि मा. ॲड. बी. बी. अमीना जमाल हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मा. श्री. ॲड. सय्यद सिकंदर अली साहेब आणि मा. श्री. ॲड. शंकरराव वानखेडे यांनी नवीन नोटरींना केलेले विस्तृत आणि उपयुक्त मार्गदर्शन. त्यांनी नोटरीच्या कामाचे महत्त्व, कायदेशीर प्रक्रिया आणि या क्षेत्रातील बारकावे याबद्दल सविस्तर माहिती दिली, ज्यामुळे नवीन वकिलांना त्यांच्या भविष्यातील कार्यात मोठा आधार मिळेल. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर वकील आणि नवीन नोटरींनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

banner

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00