Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे देण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रेसर – आमदार शंकर जगताप..

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे देण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रेसर – आमदार शंकर जगताप..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२५):-  पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टीविरहित शहर असावे, यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून शहरातील प्रत्येक गरजू व बेघरांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका अग्रेसर आहे. आज प्रधानमंत्री आवास योजनेतील डूडूळगाव येथील व आर्थिक दुर्बल घटकांच्या किवळे प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीमध्ये निवड झालेल्या नागरिकांचे शहरातील स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत डूडूळगाव येथे उभारलेल्या प्रकल्पातील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांच्या ७५५ सदनिकांचे पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संगणकीय सोडत झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते सोडतीमध्ये विजेत्या सदनिका लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, सीओईपीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर आगासे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, माजी नगर सदस्य सागर आंघोळकर, सहाय्यक आयुक्त डी. डी. कांबळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार जगताप पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर हे देशात सातव्या व राज्यात पहिल्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर म्हणून नावारूपास आले आहे. या शहरात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण करीत आहे. सदर सोडत पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे. आजच्या सोडतीत घर न मिळाल्यास नागरिकांनी निराश होऊ नये. तर त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना २.० साठी अर्ज करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

banner

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रास्ताविक केले. तर उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सदर योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार उपायुक्त बोदडे यांनी मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00