Home पिंपरी चिंचवड श्री महालक्ष्मी मंदीराच्या दानपेटया पळवुन रोकड चोरणारे दोघे ताब्यात

श्री महालक्ष्मी मंदीराच्या दानपेटया पळवुन रोकड चोरणारे दोघे ताब्यात

लोणावळा ग्रामीण पोस्टे हद्दीतील मंदीर चोरीचा गुन्हा उघड - रोख रक्कम 40 हजार रुपये हस्तगत

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

 आदरणीय सर, आज दिनांक 05/07/2025 रोजी आमचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी / अंमलदार युनिट हद्दीत पेट्रोलिंग करुन चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना लोणावळा ग्रामीण पोस्टे हद्दीत काल दिनांक 04/07/2025 रोजी रात्री 02.30 वा. चे सुमारास लोणावळा एकविरादेवीकडे जाणारे रोडवरील श्री महालक्ष्मी मंदीराचे दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून मंदीरातील दानपेटया चोरुन – फोडून त्यातील रोख रक्कम चोरल्याचा गुन्हा घडल्याची व चोरी करणारे चोरटे निगडी प्राधीकरण येथे संशयितरित्या फिरत असल्याची गोपनिय बातमी श्रेणी पोलीस उप निरीक्षक शिवानंद स्वामी यांना मिळालेने आमचे मार्गदर्शनाखाली संशयित आरोपीत यांचा शोध घेत असतांना नुराणी मस्जिद जवळ निगडी प्राधीकरण येथे आरोपीत नामे 1) अनिश फिरोज शेख वय 20 वर्षे रा. आदर्श हॉटेल समोर, भारतनगर पिपंरी 2) कैलास अशोक खलसे वय 35 वर्षे रा. भारतनगर पिंपरी यांना श्रेणी पोलीस उप निरीक्षक शिवानंद स्वामी, सहा.पोलीस फौजदार प्रमोद वेताळ, पोहवा 1603 देवा राऊत, 2929 विजय शेळकंदे, पोना 1923 आतिष कुडके, पोकॉ 2097 उध्दव खेडकर यांनी सापळा लावुन शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीत यांचे कब्जातून रोख रक्कम 40,000/- रुपये जप्त करुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 181/2025 बीएनएस कलम 305 (ए), 331 (4), 3 (5) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे . आरोपीत यांना गुन्हयाचेकामी लोणावळा ग्रामीण पोस्टेकडील पथकाचे ताब्यात दिले आहे. आरोपी पुर्वइतिहास- कैलास अशोक खलसे निगडी 161/2006 भादवि 454, 457, 380 निगडी 55/2007 भादवि 380,34 रेल्वे पिंपरी 233/2005 भादवि 457, 380, 34 रेल्वे स्टेशन पुणे- 198/2008 भादवि 454, 457, 380 पिंपरी 692/2023 भादवि 379, 34 अनिस फिरोज शेख भोसरी 34/2021 भादवि 379, 34

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00