Home पिंपरी चिंचवड भव्य वृक्षारोपण, स्वयंरक्षण प्रशिक्षण आणि लघुउद्योग मार्गदर्शन कार्यक्रम

भव्य वृक्षारोपण, स्वयंरक्षण प्रशिक्षण आणि लघुउद्योग मार्गदर्शन कार्यक्रम

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

दुर्गा ब्रिगेड संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कु. दुर्गाताई भोर यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष दिवशी “मी दुर्गा अभियान” अंतर्गत भव्य वृक्षारोपण, स्वयंरक्षण प्रशिक्षण तसेच लघुउद्योग मार्गदर्शन या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा तपशील: दिनांक: शनिवार, ५ जुलै २०२५ वेळ: भव्य वृक्षारोपण सकाळी ११ वाजता स्वयंरक्षण प्रशिक्षण आणि लघुउद्योग मार्गदर्शन कार्यक्रम सायंकाळी ०४ वाजता स्थळ: श्री अभय दादा भोर संपर्क कार्यालय एमआयडीसी प्लॉट नंबर टी ब्लॉक 97/1 A भोसरी एमआयडीसी पोस्ट ऑफिस जवळ संपर्क क्रमांक 9960877897 या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी स्वयंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार असून, युवक व युवतींना उद्योजकतेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00