Home गुन्हेगारी चिंचवडगावात खळबळ..

चिंचवडगावात खळबळ..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६) :- चिंचवड परिसरात डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास केशवनगर, मराठी शाळेसमोर चिंचवडगाव येथे घडली. याबाबत आशितोष संतोष वराडे (वय २२, व्यवसाय डिलिव्हरी बॉय, रा. चिंचवड गाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केशवनगर परिसरातून जात असताना आरोपी विकी अनिल घोलप आणि शुभम विनायक चौधरी यांनी हातातील कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. जुन्या वादातून त्यांनी फिर्यादीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

कारमध्ये असताना आरोपी विकी घोलप याने फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार केला, तर आदित्य अशोक चव्हाण याने लोखंडी कड्याने डोळ्यावर हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला गावडे जलतरण तलाव, चिंचवड येथे नेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

banner

या प्रकरणी विकी अनिल घोलप, मयुर अनिल घोलप, शुभम विनायक चौधरी, आदित्य अशोक चव्हाण, मंगेश नंदकुमार सांगळे, प्रसाद उर्फ सोन्या मारुती साबळे आणि समीर कोंडीराम भोईर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी शुभम चौधरी, मंगेश सांगळे, प्रसाद साबळे आणि समीर भोईर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00