Home पिंपरी चिंचवड ‘गल्ली ते दिल्ली’ पर्यंतचा विजयाचा महामार्ग: LEIDTECH च्या ‘चाणक्य नीती’ने राजकारणात नवा अध्याय!

‘गल्ली ते दिल्ली’ पर्यंतचा विजयाचा महामार्ग: LEIDTECH च्या ‘चाणक्य नीती’ने राजकारणात नवा अध्याय!

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love


पुणे: राजकारण केवळ भावना आणि आकांक्षांचे क्षेत्र नाही, तर ते आता विज्ञान, रणनीती आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जिंकता येते, हे गेली १४ वर्षे सिद्ध करून दाखवणारी संस्था म्हणजे LEIDTECH (चाणक्य नीती). “विजय हा योगायोग नसतो, तो रणनीतीने घडवावा लागतो” हा मंत्र घेऊन मंगेश तोडकर यांच्या दूरदृष्टीने आणि समर्पणाने उभी राहिलेली ही संस्था, राजकारणात एक नवा क्रांतिकारी अध्याय घडवत आहे.

LEIDTECH ने ‘गल्ली ते दिल्ली’ पर्यंतच्या प्रवासात, म्हणजेच स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते खासदारांपर्यंतच्या अनेक उमेदवारांना विजयाची चव चाखायला लावली आहे. त्यांच्या योजनाबद्ध प्रचारसाहित्यापासून ते रणनीतीपूर्ण सर्वेक्षणांपर्यंत, आणि मतदारांशी थेट संपर्कापासून ते डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रभावी वापरापर्यंत, प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने टाकले जाते.


चाणक्य नीती – प्रचाराची शास्त्रशुद्ध दिशा

LEIDTECH ही केवळ एक प्रचार एजन्सी नाही, तर प्रत्येक उमेदवाराच्या यशाचे स्वप्न पूर्ण करणारी एक विश्वासार्ह संघटना आहे. त्यांचा प्रचार केवळ घोषणा, बॅनर किंवा सभांपुरता मर्यादित नाही. त्याऐवजी, प्रत्येक प्रभागातील सामाजिक मनोवृत्ती, मतदारांची मानसिकता आणि त्यांचे खरे प्रश्न ओळखून, त्यानुसार विशिष्ट रणनीती तयार करणे, हे LEIDTECH चे वैशिष्ट्य आहे.

banner

LEIDTECH च्या आधुनिक आणि वैविध्यपूर्ण सेवा:

  • रणनीती आधारित राजकीय सर्वेक्षण (Political Survey)
  • घरोघरी प्रचार मोहीम (Door to Door Campaigns) – मतदारांपर्यंत थेट पोहोचणे.
  • थेट संवाद साधणारी तंत्रज्ञाने: WhatsApp, Group Concall, Missed Call Alert.
  • सोशल मीडिया आणि प्रतिमा संवर्धन (Image Building): Facebook, Instagram, Twitter चे प्रभावी व्यवस्थापन.
  • बूथ लेव्हल व्यवस्थापन आणि वॉर रूम नियोजन (Booth Level Management, War Room Planning).
  • सर्जनशील सादरीकरण: प्रचार गीत, डॉक्युमेंटरी, LED व्हॅन, स्ट्रीट प्ले.
  • प्रभावी संदेशवहन: Voice Calls, IVR System, Bulk SMS, Targeted Lead Generation.
  • डिजिटल उपस्थिती: Blue Tick Verification, YouTube Live, Google Promotions.
  • प्रिंटिंग सेवा: पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग्स, पँप्लेट्स, स्टिकर्स.

मंगेश तोडकर यांचे मनोगत – यशामागे असलेली समर्पित दृष्टी

“सोपं असणं फार कठीण असतं,” या विचारातून प्रेरणा घेत, मंगेश तोडकर गेली १४ वर्षे राजकारणाकडे केवळ छंद म्हणून नव्हे, तर बदल घडवणाऱ्या माध्यम म्हणून पाहत आहेत. B.Com आणि PMP पदवीधर असलेल्या मंगेश तोडकर यांच्याकडे व्यवस्थापन आणि उद्योजकतेचा सखोल अनुभव आहे. त्यांना राजकीय व्यवहारांची आणि मतदारांच्या बदलत्या गरजांची अचूक समज आहे.

“मी अशा स्वरूपाचं काम करतोय, ज्याचा उपयोग केवळ एका पक्षाला न होता संपूर्ण राजकीय व्यवस्थेला आणि समाजाला होईल,” असे ते सांगतात. राजकारणात पारदर्शकता, कार्यक्षमतेची नवी व्याख्या आणि मतदारांशी भावनिक नाते जोडणारी राजकीय संस्कृती उभी करणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.


LEIDTECH चा इतिहास म्हणजे यशोगाथांचा ठेवा:

LEIDTECH ने आतापर्यंत ५०० हून अधिक लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचार मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. अनेक नवोदित उमेदवार LEIDTECH च्या नियोजनामुळे विजयी झाले आहेत, हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. आज राजकीय क्षेत्रातील नवोदित उमेदवारांपासून ते प्रस्थापित नेत्यांपर्यंत सर्वांचाच या संस्थेवर विश्वास आहे, कारण इथे प्रचार केवळ एक औपचारिकता नसून, तो असतो जनतेच्या मनाचा ठाव घेण्याचा खरा मंत्र.


संपर्क आणि पत्ता:

LEIDTECH (चाणक्य नीती) A-108-109, Gera’s Imperium Oasis, सेंट्रल मॉलजवळ, मोरवाडी चौक, पिंपरी, पुणे – ४११०१८

संपर्क क्रमांक: 020-47251301 / 7350453250 / 9168685123 / 7719836994


LEIDTECH – तुमच्या यशाच्या मुळाशी असलेलं तंत्रज्ञान!

राजकारणात यश मिळवायचे असेल, तर संधी वेळेवर ओळखणे महत्त्वाचे आहे. त्या संधीला यशात रूपांतरित करायचे असेल, तर LEIDTECH हेच तुमचे उत्तर आहे!


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00