Home पिंपरी चिंचवड नवीन चेहऱ्यांचा शहर आम आदमी पार्टीत उत्साही प्रवेश…

नवीन चेहऱ्यांचा शहर आम आदमी पार्टीत उत्साही प्रवेश…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड :- समाजकारणाशी निष्ठा आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणारे शिवकुमार बसवराज बनसोडे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा शहर प्रवक्ते सुरेश गायकवाड आणि शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी विकी पासोटे यांच्या नेतृत्वाखाली बनसोडे यांनी पक्षाचा झेंडा स्वीकारत आम आदमी पार्टीच्या विचारधारेबद्दल आपला विश्वास व्यक्त केला. बोलताना त्यांनी सांगितले की, “सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पारदर्शक, स्वच्छ राजकारण घडविण्यासाठी आम आदमी पार्टीचाच मार्ग योग्य आहे.”

या कार्यक्रमात सोनू बाळासाहेब हिंगे, मयूर अशोक गंगावणे, नागेश बसवराज गायकवाड, लक्ष्मण भाजपा शिवशरण आणि प्रवीण केंजळे यांनी देखील आम आदमी पार्टीत प्रवेश करून सक्रिय सहभागाची ग्वाही दिली.

या नवीन प्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून, पिंपरी चिंचवड शहरातील जनतेपर्यंत आम आदमी पार्टीची भूमिका अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास शहराध्यक्ष रविराज काळे यांनी व्यक्त केला.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00