Home पिंपरी चिंचवड वाढदिवस पं. नरेंद्र मोदींचा तयारी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीची..

वाढदिवस पं. नरेंद्र मोदींचा तयारी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीची..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी, :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात “सेवा पंधरवडा”, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान व जीएसटी रिफॉर्म अभियान तसेच मोदी सरकारच्या विविध योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे.

या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी आज शनिवार (दि. 20) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे तसेच भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, मोदी साहेबांनी विविध वस्तुंवरील जीएसटी कपातीबाबत चांगला निर्णय घेतला. त्यामुळे बहुतांशी जीवनावश्यक वस्तु स्वस्त झाल्या आहेत. शेतीविषयक साहित्यही स्वस्त झाले. सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे. मेक ईन इंडीया, आत्मनिर्भर भारतमुळे लोकांची जीवनशैली आधुनिक होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातून मेट्रो विस्तारीकरणावर देखील भर दिला जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनाच्या माध्यमातून परवडणारी घरं तयार होत आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात “सेवा पंधरवडा”, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान व जीएसटी रिफॉर्म अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, अपंगांचा सन्मान, वृक्षारोपण, व्होकल फॉर लोकलचा प्रचार, मोदी विकास मॅरेथॉन, ‘विकसित भारत’, असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

banner

“पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपसाठी कुठेही धोक्याची घंटा नाही. विकास योजना जनतेसमोर नेत आहोत. 32 प्रभागात शत प्रतिशत भाजपसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रभागात ताकदीचे उमेदवार आहेत. निवडणूक जवळ येताच पक्षात आणखी इनकमिंग वाढणार आहे.”
–  शत्रुघ्न (बापू) काटे, भाजपा शहराध्यक्ष…


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00