Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून नोव्हेंबर अखेर एकूण २५ जण सेवानिवृत्त..

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून नोव्हेंबर अखेर एकूण २५ जण सेवानिवृत्त..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२५) :- महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे उत्तमरित्या सेवा करून सेवानिवृत्त होणारे आपल्या सहकारी अधिकारी,कर्मचारी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आपल्या कार्याचा प्रत्यय दिला आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आणि सेवानिवृत्त होणा-या अधिकारी,कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी आरोग्यदायी शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात माहे नोव्हेंबर २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ८ अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होते.

या कार्यक्रमास सह आयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता अभिमान भोसले, प्रेरणा सिनकर, जाहिरा मोमीन,संध्या वाघ,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

नोव्हेंबर २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये स्थापत्य सह शहर अभियंता अनघा पाठक, सहाय्यक आरोग्याधिकारी कुंडलिक दरवडे, मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षण मुसर्रत अन्सारी, कार्यालय अधिक्षक मीनाक्षी पवार, कनिष्ट अभियंता गुरुबसवेश्वर स्वामी जंगम, उपशिक्षक वंदना जाधव, मालन गायकवाड, प्लंबर वासुदेव आल्हाट, वॉर्ड बॉय दिगंबर वायकर, रखवालदार सहदेव तांडेल, मजूर विजय लांडगे, भाऊसाहेब सांडभोर, अनंत येलवंडे, विलास लांडे, सफाई कामगार शकील शेख, शांताराम खेंगरे, सफाई सेवक माया चव्हाण यांचा समावेश आहे.

banner

तर, स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये स्प्रे कुली पांडुरंग आधारी, सफाई कामगार शोभा नाईकनवरे, अंकुश झांझरे, कौशल्या घरत, शंकर शेंडे, लता गोठे, कचरा कुली गोविंद घुटे यांचा समावेश आहे.

सेवानिवृत्ती दिवशीच मिळाली पदोन्नती…

कार्यकारी अभियंता अनघा पाठक यांना सेवानिवृत्ती दिवशीच सह शहर अभियंता या पदावर पदोन्नती मिळाली….


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00