Home पिंपरी चिंचवड शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांकडून २८ लाखांचा दंड वसूल…

शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांकडून २८ लाखांचा दंड वसूल…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी घेतलेल्या कठोर भूमिकेअंतर्गत सार्वजनिक स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई सुरू ठेवली आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात नोव्हेंबर महिन्यात एकूण २८ लाख १२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजावी तसेच, स्वच्छता विषयक नियमांचे पालन व्हावे यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी जनजागृतीबरोबरच दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

या मोहिमेत क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सलगर, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, तानाजी नरळे, किशोर ननावरे, अतुल पाटील, पूजा दूधनाळे यांच्या नेतृत्वाखाली सहा. आरोग्य अधिकारी राजू साबळे, सुधीर वाघमारे, तानाजी दाते, शांतराम माने, राजेश भाट, किशोर दरवडे, महेश आढाव, अंकुश झिटे मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक,सहा. आरोग्य निरीक्षक तसेच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

उघड्यावर कचरा टाकणे, ओल्या-सुक्या कचऱ्याचे विलगीकरण न करणे, प्लास्टिक वापर, दुकानदारांकडे दोन डस्टबिन नसणे, सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे अशा विविध उल्लंघनांवर कारवाई करत संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.

banner

पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांनी स्वच्छता विषयक नियमांचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरू राहील.
– डॉ. प्रदीप ठेंगल उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका…


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00