Home पिंपरी चिंचवड भाजपाच्या निशा यादव यांचा संकल्प : प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोतोपरी कटिबद्ध!..

भाजपाच्या निशा यादव यांचा संकल्प : प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोतोपरी कटिबद्ध!..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. ०९ डिसेंबर २०२५) :- चिखली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या साक्षीने प्रभाग क्रमांक ११ च्या इच्छुक उमेदवार निशा (निशाताई) दिनेश यादव यांच्या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा आज कुदळवाडीत मोठ्या उत्साहात पार पडला. इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री भैरवनाथ महाराजांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसेच पदाधिकाऱ्यांनी निशाताई यादव यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांचे स्वागत केले. नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेमध्ये प्रभागातील मूलभूत सुविधा, विविध सामाजिक उपक्रमांचे दर्शन आणि स्थानिक प्रश्नांना अधोरेखित करणारी माहिती समाविष्ट असल्याचे यावेळी सांगितले गेले.

निशाताई यादव या भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या सौभाग्यवती असून, भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेले उपक्रम, प्रभागातील स्वच्छता मोहिमा, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि विकासकामांत केलेले योगदान याची उपस्थितांनी प्रशंसा केली.

लोकार्पणानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना निशाताई यादव यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. “प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांचे प्रश्न, सुविधा आणि मूलभूत विकासकामे यांना प्राधान्य देत आम्ही काम करणार आहोत. सर्वांनी साथ दिल्यास प्रभाग आदर्श बनविण्यात नक्कीच यश मिळेल,” असे त्या म्हणाल्या.

banner

कार्यक्रमाच्या शेवटी इंद्रायणी महिला प्रतिष्ठानतर्फे मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.“प्रभाग क्रमांक ११ मधील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न आहे. विकासकामे, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि तरुणांसाठी संधी—या सर्व गोष्टींना प्राधान्य देत प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपल्या विश्वासाची आणि सहकार्याची साथ मिळाली, तर आपल्या प्रभागाला आदर्श प्रभाग बनवणे हे स्वप्न निश्चितपणे साकार होईल.”

— निशा यादव, अध्यक्षा, इंद्रायणी महिला प्रतिष्ठान


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00