Home पिंपरी चिंचवड वाकड येथे शनिवारी ‘आमदार आपल्या दारी’

वाकड येथे शनिवारी ‘आमदार आपल्या दारी’

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

वाकड :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने “आमदार आपल्या दारी” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत चिंचवड मतदारसंघातील वाकड भागातील नागरिकांच्या समस्या थेट आमदारांच्या उपस्थितीत आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत ऐकल्या जाणार आहेत.
या उपक्रमाचा पुढील टप्पा वाकड येथील प्रभाग क्र.२५ व २६ मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वाकडमधील हॉटेल बर्ड व्हॅली येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
उपलब्ध सेवा आणि सुविधा..
कार्यक्रमामध्ये खालील शासकीय सेवा व समस्या निवारणासाठी नागरिकांना मदत करण्यात येणार आहे:
* शासकीय योजना आणि त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन
* शासकीय दाखले (उदा. रहिवासी, उत्पन्न, जात इत्यादी)
* रेशनकार्डसंबंधित तक्रारी आणि अर्ज
* पाणी, वीज, ड्रेनेज, आरोग्य यासंबंधी समस्या
* महापालिका व इतर शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी
* सर्वसामान्य नागरिकांच्या विविध अडचणींचे तात्काळ निवारण.
एकाच ठिकाणी सर्व सेवा..
या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, शहरी आरोग्य केंद्र, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आधार कार्ड सेवा, तसेच राजस्व विभाग आदींसह अनेक शासकीय यंत्रणांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय कामांसाठी मदत मिळणार आहे.
तक्रारींसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि अर्जासंदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत सोबत आणावी, जेणेकरून त्यांचे प्रश्न लवकर सोडवता येतील. कोणतीही अडचण न राहावी, यासाठी कार्यक्रमस्थळी स्वयंसेवकांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्व अर्जदारांनी लेखी अर्ज आणि पत्राद्वारे अर्ज दाखल करावा जेणेकरून आपल्या तक्रारीचे निवारण करणे सोपे व सोयीचे जाईल.
“नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवणे, प्रशासन व जनतेत थेट संवाद साधणे, हे आमचे कर्तव्य आहे. समस्यांवर वेळेत उपाय होणे हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे,”
– आमदार शंकर जगताप

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00