Home पिंपरी चिंचवड पुणे महानगर नियोजन समितीची सरकारकडून फसवणुक…

पुणे महानगर नियोजन समितीची सरकारकडून फसवणुक…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

चिंचवड  :- हिंजवडी, चाकण, तळेगाव, खेडसह पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वाहतुकीची समस्या आहे. पुणे महानगर नियोजन समितीला दुर्लक्षित केल्यामुळे या समस्या उद्भवल्या आहेत. ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यपालांच्या आदेशाने समिती स्थापन झाली आहे.

समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीला विश्वासात घेऊन कामकाज करावे. अन्यथा पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असे पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी सांगितले.

संस्थांमध्ये समन्यय साधून या क्षेत्राचे नियोजन करणे, काम करणे हे या वैधानिक समितीचे कर्तव्य आहे. समितीचे सदस्य वसंत भसे आणि दीपाली हुलावळे यांची चिंचवड येथे सोमवारी पत्रकार परिषद झाली.

यावेळी भसे म्हणाले की, समितीचे अधिकार दुर्लक्षित करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) केलेला प्रारूप विकास आराखडा बेकायदेशीर आहे.

banner

समितीच्या मान्यतेविना विविध संस्था बेकायदेशीर विकास योजना राबवत आहेत. पुणे महामेट्रोचा विस्तार आराखडा, जलसंपदा विभागाच्या कालवा कमिटीने घेतलेले ठराव, महामेट्रोचा वाहतूक आराखडा, जिल्हा नियोजन समितीची विकासकामे, टीपी स्कीम, रिंगरोडच्या रेखांकनामध्ये केलेले बदल, पुणे म्हाडाचे गृहप्रकल्प बेकायदेशीर ठरत आहेत, असा दावा भसे यांनी केला.

अद्यापपर्यंत एकही बैठक नाही…

महानगर नियोजन समितीची स्थापना १६ जुलै २०२१ रोजी झाली. समितीमध्ये लोकनियुक्त ३० व शासकीय १५ सदस्य आहेत. समितीची अद्यापपर्यंत एकही बैठक झाली नसून त्वरित बैठक घ्यावी. समितीसाठी अधिकारी व कर्मचारी द्यावेत, अशीही मागणी वसंत भसे यांनी केली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00