Home पिंपरी चिंचवड एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची होणार तातडीने बदली…

एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची होणार तातडीने बदली…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 11 फेब्रुवारी २०२६) :- महापालिका आस्थापनेवरील एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे आदेश नवनिर्वाचीत महापौर रवी लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.

स्थापत्य, पर्यावरण, नगररचना, बांधकाम परवाना, आरोग्य, वैद्यकीय, करसंकलन, भांडार आणि उद्यान यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लेखापाल, भांडारपाल व अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत.

एकाच विभागात दीर्घकाळ राहिल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्थानिक स्तरावर हितसंबंध निर्माण झाले आहेत.यामुळे प्रशासकीय कामांत ‘अर्थपूर्ण वाटाघाटी’ आणि भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. हे महापालिकेच्या प्रतिमेसाठी अत्यंत घातक आहे. अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतरही नियमानुसार त्यांची बदली दुसऱ्या विभागात होणे अपेक्षित होते. मात्र, विभागप्रमुखांच्या मर्जीतील असल्याने पदोन्नती मिळूनही ते त्याच जुन्या विभागात कार्यरत आहेत, असेही महापौर लांडगे यांनी स्पष्टपणे नमूद केले.

एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने इतरत्र बदली करून प्रशासनात फेरबदल करण्यात यावेत. या विषयाचे गांभीर्य ओळखून आपण तात्काळ कार्यवाही करून केलेल्या कारवाईचा अहवाल महापौर कार्यालयास सादर करावा, अशा सूचना महापौर रवी लांडगे यांनी दिल्या आहेत.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00