Home पिंपरी चिंचवड आयआयबीएमच्या कु. प्रतिक्षा सुभाष डफळ ‘झाशीची राणी’ पुरस्काराने सन्मानित..

आयआयबीएमच्या कु. प्रतिक्षा सुभाष डफळ ‘झाशीची राणी’ पुरस्काराने सन्मानित..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 11 फेब्रुवारी २०२६) :-आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, चिखली, पुणे येथे आयोजित झेस्ट क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ संस्थेचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी कु. प्रतिक्षा सुभाष डफळ यांना “झाशीची राणी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रियदर्शनी क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण जाधव, जी-९९ स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष गिरीश बिंजवे, ज्योती बडेकर, आर्यन मस्के, आयआयबीएम कॉलेजचे प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, विभागप्रमुख अनिकेत वंजारी, विभागप्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, विभागप्रमुख संदीप जाधव तसेच सर्व शिक्षक व उपशिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी प्रियदर्शनी क्रीडा प्रतिष्ठान व जी-९९ स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने कु. प्रतिक्षा डफळ यांना “झाशीची राणी” पुरस्कार देण्यात आला. मागील वर्षभरातील उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य, विभागप्रमुख तसेच शिक्षक व उपशिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते क्रीडांगणावर ज्योत फिरवून मैदानाचे पूजन करण्यात आले व स्पर्धांना सुरुवात झाली.

banner

प्रमुख पाहुणे किरण जाधव यांनी विद्यार्थ्यांना फिटनेस व नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. तर गिरीश बिंजवे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्याची काळजी घ्यावी, शिस्तबद्ध व नीटनेटके जीवन जगावे, असा संदेश दिला.

संस्थेचा आठ दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, डॉजबॉल, धावण्याच्या स्पर्धा, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ तसेच इलेक्ट्रॉनिक गेम्स अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. महोत्सवाचा पहिला दिवस आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00