Home पिंपरी चिंचवड सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे..

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी :- अनुसूचित जाती घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे प्रमुख नारायण कुचे यांनी दिले.

पुणे जिल्हा दौऱ्यावर असलेल्या समितीची बैठक आज पिंपरी चिंचवड महापालिकेत पार पडली. बैठकीत आमदार अमित गोरखे, भीमराव केराम, तानाजी मुटकुळे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अनुसूचित जातींच्या कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात आला. नारायण कुचे यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. स्वतंत्र निधी केवळ संबंधित योजनांसाठी वापरावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सफाई कर्मचाऱ्यांबाबत विशेष उल्लेख करत कुचे म्हणाले, “त्यांच्या प्रश्नांकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. त्यांना हक्काचे हक्क मिळाले पाहिजेत व आरोग्यसुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात.”

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00