Home पिंपरी चिंचवड थोर साईभक्त माजी आमदार प्रकाश देवळे यांच निधन..

थोर साईभक्त माजी आमदार प्रकाश देवळे यांच निधन..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

चिंचवड :- मावळ तालुक्यात शोककळा पसरवणारी दुःखद वार्ता समोर आली आहे. माजी आमदार तसेच शिरगाव येथील प्रसिद्ध प्रतिशिर्डी साईबाबा संस्थान चे संस्थापक विश्वस्त प्रकाश देवळे यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने समाजकारण, शिक्षण व धार्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रकाश देवळे यांनी शिरगावमध्ये प्रतिशिर्डी साई संस्थानाची स्थापना करून हजारो भाविकांसाठी श्रद्धास्थान उभे केले. या उपक्रमातून त्यांनी समाजात आदर्श कार्याची परंपरा निर्माण केली. त्यांच्या प्रयत्नातून शिरगाव हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात घुमले. शिक्षण व सामाजिक कार्यातही त्यांनी मोठे योगदान दिले.

देवळे यांच्या निधनाची वार्ता कळताच मावळ तालुक्यासह पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिक, साईभक्त आणि त्यांच्या अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

आज दुपारी दोन वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचा अंत्यसंस्कार होणार असून, मोठ्या संख्येने नागरिक व साईभक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00