Home पिंपरी चिंचवड काळेवाडीत पेट्रोल टाकून गाड्यांना लावली आग..

काळेवाडीत पेट्रोल टाकून गाड्यांना लावली आग..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

काळेवाडी (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- काळेवाडीतील अष्टविनायक कॉलनी येथे इस्टेटवरून झालेल्या वादातून दोन भावांनी पेट्रोल टाकून गाड्यांना आग लावली, घराच्या काचा फोडल्या आणि महिलेला तसेच तिच्या पतीला मारहाण केली. या धक्कादायक घटनेत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारास  अष्टविनायक कॉलनी, ज्योतिबानगर येथे घटना घडली.

फिर्यादी महिला (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी सचिन श्रीमंत हंगरगे (३५) आणि अमोल श्रीमंत हंगरगे (३०, दोघे रा. काळेवाडी) यांनी इस्टेट नावावर करून देण्याच्या नावाखाली वाद घालत ब्रिझा आणि बुलेट या वाहनांवर पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर त्यांनी दगड मारून गाड्यांचे नुकसान केले व घराच्या काचा फोडल्या.

यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि तिच्या पतीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपी सचिन हंगरगेने दगड मारून फिर्यादींच्या पतीच्या कपाळावर दुखापत केली आणि पोलिसात तक्रार दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबाला रॉकेल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिली.

banner

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00