Home पिंपरी चिंचवड शस्त्राचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलिस आयुक्तांची कठोर कारवाई..

शस्त्राचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलिस आयुक्तांची कठोर कारवाई..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड, (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- परवान्यावरील शस्त्रांचा गैरवापर करून जीवितास धोका निर्माण केल्याच्या दोन गंभीर घटनांनंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर पाऊल उचलत दिनेश बाबुलाल सिंग (रा. मामुर्डी, देहूरोड, पुणे) आणि गणपत बाजीराव जगताप (रा. मारुंजी, पुणे) यांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत.

पहिल्या घटनेत, दिनेश सिंग यांनी ८ जुलै २०२५ रोजी बावधन पोलिस ठाणे हद्दीत एका फार्महाऊसवरील पार्टीदरम्यान त्यांच्या परवानाधारक पिस्तुलातून हवेत दोन फायर केले होते. या फायरिंगमुळे उपस्थितांच्या जीवितास धोका निर्माण झाला आणि बावधन पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या घटनेत, गणपत जगताप यांनी २१ जुलै २०२५ रोजी यवत येथे त्यांचे परवानाधारक शस्त्र दुसऱ्या व्यक्तीला देऊन हवेत फायर करण्यास परवानगी दिली होती. या प्रकारामुळेही जीवितास धोका निर्माण झाला असून, त्यांच्या विरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

दोन्ही घटनांवर प्राथमिक चौकशी केल्यानंतर परवानाधारकांनी शस्त्रांचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाल्याने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांचे परवाने रद्द करण्यात आले.

banner

यापूर्वीही अशाच स्वरूपात शस्त्रांचा गैरवापर करणाऱ्या संतोष पवार (रा. कुदळवाडी, चिखली) आणि संतोष कदम (रा. ताथवडे, पुणे) यांचे परवाने रद्द करण्यात आले होते. एकूण सन २०२५ मध्ये चार परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले असून, पोलिस आयुक्त चौबे यांनी “शस्त्राचा गैरवापर करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” असा इशारा दिला आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00