पिंपरी प्रतिनिधी : आज पुणे जिल्ह्यातील औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चाकण-तळेगाव एम.आय.डी.सी परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यात यावे, यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभय भोर व उद्योजकांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये अभय भोर यांनी नमूद केले की, पुणे जिल्ह्यातील भोसरी, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, भीमा कोरेगाव, राजगुरुनगर, आळंदी, रांजणगाव परिसरात हजारो लघु व मध्यम उद्योजक कार्यरत असून, त्यांना माल वाहतुकीसाठी सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर माल पोहोचवणे, निर्यातीस चालना देणे व लॉजिस्टिक खर्च कमी करणे या दृष्टीने चाकण परिसरात कार्गो एअरपोर्ट ही काळाची गरज ठरत आहे. चाकण पिंपरी चिंचवड तळेगाव रांजणगाव या भागात कमीत कमी 30 ते 35000 छोटे-मोठे उद्योग आहेत आणि या भागातून इतर राज्यांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय दळणवळण होत असते चाकण येथे कार्गो एअरपोर्ट येणार म्हणून अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी आपले उद्योग सुरू केले परंतु शासनाने या ठिकाणी उद्योजकांची फसवणूक केल्यासारखे झाले . पुरंदरला विमानतळ जाणार याचे संकेत 2007 लाच अनेक आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये सुद्धा आले होते म्हणजे पुरंदरचे विमानतळ म्हणजे एक राजनैतिक डाव असल्याचे दिसून चाकण आणि परिसरातील कोणत्याही भागात मिनी कार्गो एअरपोर्ट झाल्यास नक्कीच उद्योजकांना सुविधाजनक सोय निर्माण होणार आहे तरी कृपया आमच्या मागणीचा विचार करून चाकण येथे मिनी कार्गो एअरपोर्ट प्रस्ताव करावा अशी मागणी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री अभय भोर आणि उद्योजकांनी आज निवेदनाद्वारे हवाई वाहतूक मंत्री मा श्री मुरली जी मोहोळ यांच्याकडे केली. यावेळी अभय भोर(अध्यक्ष) वैभव जगताप (उपध्यक्ष) ,दुर्गा भोर ,जयश्री साळुंखे,हर्षवर्धन लोखंडे,राजीव केंद्रे आदी उपस्तिथ होते फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे करण्यात आलेल्या या प्रयत्नामुळे परिसरातील उद्योजकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, या विमानतळामुळे औद्योगिक विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
76