Home पिंपरी चिंचवड ” पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल येथील १३ पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिनांक ३०/०६/२०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.”

” पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल येथील १३ पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिनांक ३०/०६/२०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.”

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

 ” पिंपरी चिंचवड :  पोलीस आयुक्ताल येथील १३ पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिनांक ३०/०६/२०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.” मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३०/०६/२०२५ रोजी १६.०० वा. पोलीस मुख्यालय, निगडी, पुणे या ठिकाणी करण्यात आले होते. पिंपरी चिचंवड आयुक्तालयातील आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार खालील प्रमाणे आहेत.

पोलीस अधिकारी / अंमलदार नाव श्री. दिपक आनंदराव कांबळे पोलीस उपनिरीक्षक / अतिक्रमण विभाग श्री. सुबराव भिमराव गवारे पोलीस उपनिरीक्षक / एसीपी पिंपरी विभाग श्री. पांडुरंग विठ्ठल सोनवणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / चिखली पोलीस स्टेशन श्री. निवृत्ती चिमाजी रेंगडे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / वाहतुक विभाग श्री. संजय गणपत घाडगे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / पिंपरी पोलीस स्टेशन श्री. मारुती बबन पशाले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / पिंपरी पोलीस स्टेशन श्री. नवनाथ रावजी पिंगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / वाहतुक विभाग श्रीमती. रागिणी संजय खांडेकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / पोलीस मुख्यालय श्री. उत्तम विनायक तरंगे सहायक पोलीस उपनिरीक्षक / संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन श्री. दादा शिवराम खंडाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक / चिखली पोलीस स्टेशन श्री. मोहन एकनाथ चोरमले सहायक पोलीस उपनिरीक्षक / आर्थिक गुन्हे शाखा श्री. पोपट मारुती भोसुरे पोलीस शिपाई ब.नं.२०१६ / वाहतुक विभाग श्री. माणिकराव शंकर ठाकरे पोलीस शिपाई ब.नं.२३२१ / पोलीस मुख्यालय सदर आयोजीत कार्यक्रमात सह पोलीस आयुक्त, मा. श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड, तसेच पोलीस उपआयुक्त, श्रीमती श्वेता खेडकर, श्री. विवेक पाटील, पिंपरी चिंचवड यांनी त्यांचे शुभहस्ते नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा कुटुंबियासह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, मोमेटो, झाडाचे रोपटे, भेटवस्तु (साडी) देवुन सत्कार केला तसेच त्यांचे भावी आयुष्याकरिता व आरोग्या करिता शुभेच्छा दिल्या. वरिल कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त, मा. श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. सारंग आवाड, तसेच पोलीस उपआयुक्त, श्रीमती श्वेता खेडकर, श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक श्री. नितीन लांडगे, राखीव पोलीस निरीक्षक श्री. महेश साळवी, पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड मधील कर्मचारी वृदं व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार यांचे नातेवाईक उपस्थित होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00