Home पिंपरी चिंचवड आमदार अमित गोरखे यांची विधानपरिषदेच्या ‘तालिका सभापती’ पदी निवड

आमदार अमित गोरखे यांची विधानपरिषदेच्या ‘तालिका सभापती’ पदी निवड

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

मुंबई :- पावसाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू आणि नव-चर्चित तरुण आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी सभागृहात केली.
या निवडीवर प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले “सभापती राम शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि जबाबदारीची बाब आहे. तालिका सभापतीपद ही केवळ एक पद नाही, तर विधानपरिषदेच्या कार्यवाहीतील शिस्त, प्रक्रियात्मक पारदर्शकता आणि संयमाचे प्रतिनिधित्व करणारी भूमिका आहे. या पदाचा योग्य मान राखण्यासाठी आणि सभागृहाच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे योगदान देईन. “नवनिर्वाचित आमदार म्हणून सभागृहात माझे पदार्पण होत असतानाच मला हे पद मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो माझ्यासाठी अनमोल आहे. मी सभागृहातील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी या निवडीला सहमती दर्शवली.”
“विशेषत: महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळेच मी आज या जबाबदारीच्या ठिकाणी उभा आहे. आपण दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन.”
आमदार अमित गोरखे यांना त्यांची ठाम वक्तृत्वशैली, मुद्देसूद अभ्यास, आणि जनतेशी असलेली थेट नाळ यासाठी ओळखले जाते. या नियुक्तीमुळे विधानपरिषदेत भाजपच्या युवा नेतृत्वाला बळ मिळाले असून, सभागृहात नवा ऊर्जा प्रवाह निर्माण होईल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00