Home पिंपरी चिंचवड वडमुखवाडीतील सोसायटीत मेंटेनन्स निधीमध्ये लाखोंचा घोटाळा…

वडमुखवाडीतील सोसायटीत मेंटेनन्स निधीमध्ये लाखोंचा घोटाळा…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 16 फेब्रुवारी 2026) :- वडमुखवाडीतील एका सोसायटीतील मेंटेनन्स निधीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०१८ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी विक्रम रामस्वरूप बक्षी (वय ५८, रा. दिघी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सोसायटीसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेल्या कार्यकारी समितीतील काही पदाधिकाऱ्यांनी आणि संबंधित सदस्यांनी संगनमत करून सभासदांकडून गोळा केलेल्या मेंटेनन्स निधीचा गैरवापर केला.

आरोपींमध्ये तापकिर, काशीकर, घुटक, सावते, घोलप, तापकिर, गावगर, दौडकर, अडसुळ, देशमुख, तापकिर आणि सलगर यांचा समावेश आहे.

तक्रारीनुसार, मेंटेनन्सच्या रकमेतून मोठी रक्कम अपहार करून त्या व्यवहारांना वैध ठरवण्यासाठी बनावट ऑडिट अहवाल तयार करण्यात आला. संबंधित ऑडिटरनेही या प्रक्रियेत मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सोसायटीतील सभासदांची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

banner

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वरे पुढील तपास करत आहेत. पोलीस प्रशासनाने संबंधित आर्थिक कागदपत्रांची छाननी सुरू केली असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00