पिंपरी चिंचवड (दि. 14 फेब्रुवारी 2026) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेच्या हालचालींमुळे राजकीय वातावरण तापले असून यामागे भाजपची रणनीती असल्याची चर्चा रंगली आहे.
महापालिकेत सध्या भाजपकडे सत्ताबळ आहे. त्यामुळे नव्या आराखड्यानुसार आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या जागी दहा कार्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. विशेषतः काही क्षेत्रांमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक अधिक असल्याने त्या कार्यालयांवरील अध्यक्षपद विरोधकांकडे जाऊ नये, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या बदलांमुळे प्रभागांची नव्याने मांडणी होणार असून समित्या व पदांच्या वाटपावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुका व सत्तासमीकरण लक्षात घेऊन भाजपने ही खेळी केल्याचे निरीक्षकांचे मत आहे.