Home पिंपरी चिंचवड प्रभाग २७ मध्ये वाढत्या मच्छर प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त..

प्रभाग २७ मध्ये वाढत्या मच्छर प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 14 फेब्रुवारी 2026) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीरनगर, श्रीनगर व रहाटणी परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर साई मल्हार सोशल फाऊंडेशनचे सचिव विवेक मल्हारी तापकीर यांनी महानगरपालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

मच्छरांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात साचलेले पाणी, नाल्यांची अपुरी साफसफाई व कचऱ्याचा साठा यामुळे मच्छरांची पैदास वाढत असल्याचे तापकीर यांनी नमूद केले.

औषध फवारणी, धूर फवारणी, साचलेल्या पाण्याचे निर्मूलन, नियमित स्वच्छता मोहीम तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00