Home पिंपरी चिंचवड उमेश पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत निष्ठा विकली होती का ? – राजू दुर्गे

उमेश पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत निष्ठा विकली होती का ? – राजू दुर्गे

लंगोट बांधायला देखील पैलवानाचं काळीज लागतं, पिंपरी चिंचवड भाजपाची आक्रमक प्रतिक्रिया

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी :- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. महायुतीतीलच सहकारी पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्यावर ‘तुम्हाला लंगोट घालायला कोणी शिकवला? असं वक्तव्य करीत प्रसारमाध्यमात त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड भाजपचे पक्षप्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी खरपूस समाचार घेत त्यांच्यावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जोरदार हल्ला चढवला आहे.
पत्रकात राजाभाऊ दुर्गे यांनी म्हटले आहे की, हे प्रदेश प्रवक्ते आज ज्या पक्षाची पाठराखण करताना दिसतात, त्यांनाच विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या पक्ष प्रमुखांनी काय उपमा दिली होती याचा त्यांना विसर पडलेला दिसतो आहे. त्यानंतर याच पक्ष प्रवक्त्यांनी निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यांना कोणीही त्यावेळी कोणत्याही पक्षात घेतले नाही म्हणून हे महाशय महायुतीतील आमच्या सहकारी पक्षाकडे परत आले आहेत. अशा या सतरा पक्षांनी ओवाळून टाकलेल्या आमच्या महायुतीतील सहकारी पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षनिष्ठा व तुमचं नेतृत्व प्रेम कुठे गेलं होतं असा देखील सवाल दुर्गे यांनी उपस्थित केला.
गेल्या दहा वर्षात पिंपरी-चिंचवड शहराचा विकास भाजपने केला आहे. हे शहराच्या जनतेला माहित आहे; अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा शास्तीकराचा प्रश्न कोणी मार्गी लावला हे देखील पिंपरी-चिंचवड करांना चांगलेच ठाऊक आहे. विकासाबद्दल व योगदान बद्दल स्व. खा. आण्णासाहेब मगर, स्व. माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे, स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,  आमदार महेश लांडगे यांचेही मोठे योगदान आहे
या सर्वांनी पिंपरी चिंचवड शहर कामगार नगरीचा नावलौकिक जगभर पोहचविला हे आपल्याला विसरता येणार नाही. आमदार महेश दादांनी त्यांच्या भाषणात अजित दादांचे उल्लेख देखील केला नव्हता; त्यामुळे टीका करण्याचा प्रश्नच नव्हता,  मात्र काही नवख्या मंडळींनी नुकताच प्रवेश केला आणि त्यांनी हे वातावरण तयार केलं हे मात्र या प्रदेश प्रवक्त्यांना समजलंच नाही.
मुळात लंगोट बांधायला देखील पैलवानाचं काळीज लागतं. आमदार महेश लांडगे यांचे वडीलच त्यांचे वस्ताद आहेत. त्यांनीच महेश लांडगे यांना लंगोट बांधायला शिकवले आहे. ज्या बाप वस्तादाने त्यांना कुस्ती खेळायला शिकवली. लंगोट बांधायला शिकवली त्याच्यां बद्दल आमदार महेश लांडगे नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतात. अशा कृतज्ञशील व्यक्तीला तुम्ही कृतज्ञता शिकवायची गरज नाही. मुळात कृतज्ञता काय असते ? हे आधी या पक्षात, नंतर दुसऱ्या पक्षात, पुन्हा दुसऱ्या पक्षातून पहिल्या पक्षात अशा सतत इकडून तिकडे, तिकडून इकडे पळणाऱ्या अविश्वासू कृतघ्न व्यक्तीला कशी कळणार ? हवा लागल्यास दिव्यातील वात जशी फडफड करून विझून जाते. तशीच प्रवक्ते साहेब तुमची आज अवस्था झाली आहे. त्यामुळे हिशोबात बोला आणि रहा.अन्यथा भोसरीचा तेल लावलेला पैलवान तुम्हाला कधी चीतपट करील हे तुम्हाला कळणार देखील नाही. आम्ही युती धर्म पळतोय म्हणून शांत आहोत एवढेच काय ते आपण समजून घ्यावे. अशा शेलक्या शब्दात उमेश पाटील यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे शहर प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे यांनी सडसडून टीका केली.

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00