Home पिंपरी चिंचवड दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. २४ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस शहर अभियंता मकरंद निकम यांच्या हस्ते तर निगडी येथील लोकमान्य टिळक चौकातील त्यांच्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास माजी नगरसदस्या सुमन पवळे,सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मधूकर पवळे यांच्या नातेवाईक अनिता लांडे, सुनिता चोरघे, रेणुका उत्तेकर, ज्योती गवारे, राजलक्ष्मी चोरघे, ओंकार पवळे, विनीत गवारे, सिद्धिराम शिरसाईल आदी उपस्थित होते.

तर निगडी येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्य अजित गव्हाणे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे, पंकज बगाडे, राजाराम राऊत, भिकाजी केंजळे, लहू धुमाळ, सचिन रोमन, तुकाराम राऊत, राजाराम लोंढे, विनीत गवारे, विनायक चोरघे यांच्यासह पवळे कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00