Home पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागात संजय भिसे यांचा पर्यावरणासाठी पुढाकार..

पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागात संजय भिसे यांचा पर्यावरणासाठी पुढाकार..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 13 फेब्रुवारी 2026) :- उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते संजयशेठ भिसे आणि नगरसेविका डाॅ. कुंदाताई संजय भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्यात आले. प्रभाग क्रमांक २८ अंतर्गत पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर भर देत डस्टबीन वाटप तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी परिसरात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यावेळी ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशन, विठाई वाचनालय, आनंद हास्य क्लब, नवचैतन्य हास्य क्लब, कोकणे चौक हास्य क्लबचे सदस्य आणि पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या की, प्रभागातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध करण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याला पूरक म्हणून माझे पती संजय भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहिमेला सक्रिय पाठबळ देत सोसायट्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी डस्टबीन वाटप केले. कचरा वर्गीकरणामुळे पुनर्वापर प्रक्रियेला चालना मिळून प्रभाग आणि पर्यायाने शहर स्वच्छ राहण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

संजय भिसे यांनी सांगितले की, पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. वाढत्या प्रदूषणामुळे शहरामध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पिंपळे सौदागर आणि रहाटणी प्रभागात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यावर भर दिला जात आहे. भविष्यात अधिक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

banner

”या उपक्रमामुळे प्रभागात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे. सामाजिक कार्याद्वारे समाजात जनजागृती निर्माण करण्याचा भिसे दाम्पत्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.
जेष्ठ नागरिक….


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00