डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवडसाठी महापालिकेची ‘ब्रेक द चेन’ मोहिम

Spread the love

पिंपरी :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती, स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागातून शहरात डास निर्मूलन करणे हा आहे.

राज्य शासनाच्या डेंग्यू प्रतिबंधात्मक धोरणानुसार ‘तपासा, स्वच्छ ठेवा आणि झाका’ (Check, Clean, Cover) ही त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरात साचलेले पाणी तपासणे, दर आठवड्याला टाक्या व पाणी साठवणाऱ्या भांड्यांची स्वच्छता करणे आणि पाणी साठवणारी भांडी झाकून ठेवणे आवश्यक आहे. ही उपाययोजना वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर राबविल्यास डेंग्यूच्या प्रसाराला प्रतिबंध करता येतो. याच उद्देशाने महापालिकेमार्फत जनजागृतीसह विविध प्रत्यक्ष कृतींवर भर दिला जात आहे.

याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या मोहिमेला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ‘5S धोरण’ (5S Strategy) स्वीकारली असून, या अंतर्गत नागरिकांनी डेंग्यूविरोधात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या पाच सूत्रांमध्ये Search and Destroy (डास उत्पत्तीची ठिकाणे शोधा व नष्ट करा), Self-Protection (स्वतःचे डासांपासून संरक्षण करा), Support Fogging and Insecticidal Activities (फॉगिंग व कीटकनाशक फवारणीस सहकार्य करा), Seek Early Consultation (ताप व इतर लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या), आणि Sustain Hydration (पुरेसे पाणी प्या, शरीराचे द्रवपातळी संतुलित ठेवा) या बाबींचा समावेश आहे. ही पाच सूत्रे लक्षात घेऊन, शहरातील प्रत्येक नागरिकाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणाव्यात आणि आजार होण्याआधीच त्याला रोखावे, असा संदेश महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत दिला जात आहे. 

banner

या मोहिमेंतर्गत सोमवार ते शनिवार दररोज विविध क्षेत्रांमध्ये नियोजनबद्ध कार्यवाही केली जाईल. यामध्ये रुग्णालये, शाळा, बँका, मॉल्स, सिनेमागृहे, कार्यालये, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांमध्ये डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहेत. जनजागृतीसाठी व्याख्याने, रॅली, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, सोशल मीडियावरील व्हिडिओज आणि एलईडी स्क्रिनद्वारे माहितीप्रसार या सर्व माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे योजिले आहे. 

याशिवाय, सामाजिक संस्थांच्या मदतीने चर्चासत्र, परिसंवाद आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याची योजना सुद्धा नियोजित आहे. या मोहिमेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नोडल वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, किटकनाशक निरीक्षक अशा अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ८ विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके शहरभर डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यरत राहतील.

या मोहिमेमागे प्रशासकीय पातळीवरून ठोस नियोजन करण्यात येत असून, या उपक्रमात विविध विभागांचे समन्वय साधत कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी आयुक्त मा. शेखर सिंह यांचे मार्गदर्शन लाभत असून, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मा. उप आयुक्त सचिन पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश देशपांडे , मुख्य आरोग्य निरीक्षक श्री. श्रीराम गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर व इतर अधिकारी, कर्मचारी सातत्याने परिश्रम घेत आहेत.

शहराच्या आरोग्यासाठी प्रशासन, वैधकीय विभाग, समाज आणि नागरिक एकत्रितपणे कार्यरत राहिले तर डेंग्यूसह सर्व कीटकजन्य व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. म्हणूनच ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम ही फक्त वैद्यकीय विभागाची नव्हे तर प्रत्येक पिंपरी चिंचवडकराची जबाबदारी आहे, असे आवाहन मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी या प्रसंगी केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00