Home पिंपरी चिंचवड समर्पित भावनेतून समाजसेवेची मिळाली प्रेरणा!..

समर्पित भावनेतून समाजसेवेची मिळाली प्रेरणा!..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२५) :- गेली 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचा वाढदिवस महिनाभर साजरा व्हावा, हा चमत्कार आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. यावर्षीचा वाढदिवस सफाई व घर कामगार माता-भगिनींना समर्पित करण्यात आला. त्यांचा सन्मान करताना विशेष आनंद वाटला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये कष्टकऱ्यांचा सन्मान करीत विधायक पद्धतीने अभिष्ठचिंतन झाले. समर्पित भावनेतून आणखी सकारात्मक ऊर्जेने समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावनिक प्रतिक्रिया भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

भोसरी येथील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजारो दादाप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. वाढदिवसानिमित्त महिनाभरात भोसरी विधानससभा आणि शहर व ग्रामीण भागामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम असे 100 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते.

या आनंददायी प्रसंगी, सवपक्षीय लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्तरावरील मित्रपरिवाराबरोबरच राज्यस्तरीय अनेक मान्यवरांनी देखील शुभेच्छा दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, तसेच अनेक कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेचे आमदार, विधानसभा सदस्य यांसह शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी लांडगे यांना हार्दिक शुभेच्छा आणि पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा संदेश दिला आहे.

विधायक उपक्रमांनी आदर्श…
महिनाभरात झालेल्या रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यामधून 2 हजाराहून अधिक पिशव्या रक्तसंकलन झाले आहे. विशेष म्हणजे, 10 हजाराहून अधिक नागरिकांनी आरोग्य शिबिरांमधील विविध सेवांचा लाभ घेतला आहे. तसेच, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक प्रबोधनाचे उपक्रमांनी शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, ‘‘हिंदुभूषण क्रीडा महोत्सव’’ यांमुळे तब्बल 10 हजाराहून भोसरीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात सकस उपक्रमांची रेलचेल दिसून आली. यावर्षीचा वाढदिवस आमदार लांडगे यांनी ’’सफाई व घरकामगार माता-भगिनींना समर्पित’’ केला आहे. या निमित्त 4 हजार 320 महिलांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना भेटवस्तू देण्यात आली. तसेच, संबंधित माता-भगिनींना शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

banner

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 पासून शहरात अत्यंत सकारात्मक ऊर्जेने काम करण्याची संधी मिळाली. माय-बाप पिंपरी-चिंचवडकरांनी ठेवलेला निरंतर विश्वास हा माझे बलस्थान आहे. माझे सहकारी आणि मित्र परिवार यांनी सामाजिक कार्याचा हा वसा जोपासला आहे. या सामाजिक उत्सवामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये समाजाभिमुख कार्याची नवी परिभाषा वैभवाने साकार झाली आहे. या पुढील काळात देव–देश–धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी समर्पित भावनेतून कार्यरत राहीन.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00