Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभांचे लाईव्ह प्रक्षेपण तात्काळ सुरू करा..

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभांचे लाईव्ह प्रक्षेपण तात्काळ सुरू करा..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड : – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती तसेच विशेष सभांचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.

याबाबत पिंपरीत पत्रकार परिषदेचे आज सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे, राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे उपस्थित होते.

नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने दिलेल्या नोटिशीत महापालिकेच्या सर्व महत्त्वाच्या बैठका नागरिकांसाठी ऑनलाईन थेट प्रसारित करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कामकाजाची माहिती मिळणे हा त्यांचा मूलभूत लोकशाही अधिकार असल्याचा दावा करण्यात आला असल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ तसेच डिजिटल प्रशासन आणि पारदर्शकतेसंदर्भातील राज्य शासनाच्या धोरणांचा उल्लेख करत, महापालिकेच्या बैठका पुन्हा लाईव्ह करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच यापूर्वी झालेल्या सभांचे व्हिडीओ संग्रहित करून नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केल्याचे यावेळी सांगितले.

banner

नोटिशीत महापालिका प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सकारात्मक निर्णय न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

महापालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण बंद झाल्यामुळे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून नाराजी व्यक्त होत असताना या कायदेशीर नोटिशीमुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नोटिशीवर ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रिया आवळे, ॲड. तृप्ती गायकवाड आणि ॲड. आर्या राजे भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने ही कार्यवाही करण्यात आल्याचे समजते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00