दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. मलबार गोल्ड ॲन्ड डायमंड्स, पिंपरी शाखेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे विशेष सहकार्य लाभले. उद्योजक शंकरराव शेळके आणि प्रमुख पाहुणे नितीन जुन्नरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष नंदिनी टाले, उपाध्यक्ष विठ्ठलराव कांबळे, संपदा नातू, काशिनाथ उंडे, स्नेहल रानडे, आशा जैन, किसन शिंदे, विनायक हेंद्रे आणि लक्ष्मीकांत कुलकर्णी उपस्थित होते. मलबार गोल्ड ॲन्ड डायमंड्स, पिंपरी शाखेचे जय रामचंद्र मिसाळ, नेहा मलकेकर, विशाल माने आणि रोहित वाडमारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. “गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा त्यांच्या कष्टांचा गौरव आहे. अशा उपक्रमांमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू,” असे जय रामचंद्र मिसाळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची चांगली उपस्थिती होती. सत्कारामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.