Home पिंपरी चिंचवड मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी..

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

मावळ (दि.०९ डिसेंबर २०२५):- मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.

फसवणुकीत सामील दलालांनी खोट्या मोजणी नकाशावर बांधकाम परवानगी घेतल्याचे, कोणताही पूर्णत्वाचा दाखला (OC) न घेता प्रकल्पांची विक्री केल्याचे, शिवाय वनीकरण झोनमध्ये बेकायदेशीर बांधकाम करून हजारो ब्रास उत्खननही केल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे अनेक कंपन्यांची फसवणूक झाल्याने, संबंधित दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शेळके यांनी मांडली. पीएमआरडीएनेही या प्रकरणांवर नोटीस बजावल्यानंतर या व्यवहारांमधील धांदली अधिक स्पष्टपणे बाहेर आली आहे.

मावळातील एमआयडीसी परिसरात वाढत्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या कंपन्या येथे व्यवसाय उभारण्यास इच्छुक आहेत; मात्र काही दलाल बनावट झोन दाखले, नकाशे बदलणे, चुकीची परवानगी दाखवणे, आणि गुंतवणूकदारांना दिशाभूल करून मिळकतीची विक्री करीत असल्याचे शेळके यांनी निदर्शनास आणले. “मी मागील सहा वर्षांत माझ्या मतदारसंघातील उद्योगांच्या ठाम पाठीशी उभा राहिलो आहे; कोणत्याही कंपनीचा ठेका घेतलेला नाही,” असे सांगत त्यांनी स्वतःवरील आरोपांनाही उत्तर दिले.

“मावळ तालुक्यात येणाऱ्या उद्योगांशी फसवणूक करणाऱ्या दलालांना आम्ही सुट्टी देणार नाही,” असा कठोर इशारा देत आमदार शेळके यांनी या सर्वांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

banner

याचदरम्यान, या गंभीर फसवणूक प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती सादर केली. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तत्काळ कारवाईचे संकेत दिल्याचे समजते. त्यामुळे पुढील काही दिवसांत संबंधित दलालांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. या भेटीमुळे संपूर्ण प्रकरणाला आता राज्यस्तरावरून गती मिळणार असल्याची चर्चा राजकीय व औद्योगिक क्षेत्रात सुरू आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00