Home पिंपरी चिंचवड दहशती करीता व तस्करी करण्या करीता अवैध पिस्तुल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीविरुध्य महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोका) कायदया अंतर्गत कारवाई

दहशती करीता व तस्करी करण्या करीता अवैध पिस्तुल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीविरुध्य महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोका) कायदया अंतर्गत कारवाई

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

दिनांक ०१/०६/२०२५ रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोशि/२६४३ गणेश सावंत यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, काही इसमांनी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगले आहे त्यावर गालगत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वपोनी ढगाळ पोलीस अंमलदार गणेश सावंत, पोहता सोमनाथ गोरे, पोहया गणेश हिंगे, पोशि विनोद वीर, पोशि सुमित देवकर, पोशि हर्षद कदम यांनी जुना पुणे मुंबई हायवे लगत, निलया सोसायटी जवळ, तळेगाव दाभाडे, ता मावळ, जि पुणे येथुन इसग नागे १) उमेश चंद्रकांत केदारी, वय २८ वर्षे, रा कोयतेवस्ती, पुनावळे, ता मुळशी, जि पुणे. २) गंथन उर्फ गुड्ड अशोक सातकर, वय २८ वर्षे, रा कान्हे, ता मावळ, जि पुणे. ३) विशाल ज्योतीराम खानेकर, वय ३० वर्षे, रा-मोहितेवाडी, ता मावळ, जि पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ०५ पिस्टल, २० जिवंत काडतुसे व ०२ मॅक्झीन असे जप्त केली. सदर आरोपी विरुध्द तळेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ११८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) राह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचे तपासात आरोपी यांनी पिस्तुले दहशत माजविण्याकरीता व तस्करी करीता आणल्याचे निष्पन्न झाले. तसेच नमुद आरोपी हे रेकॉडवरील असुन ते संघटित गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन सदर गुन्हयात मा. अप्पर पोलीस आयुक्त सो पिंपरी चिचवड यांचे आदेशाने दिनांक २४/०६/२०२५ रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (४) प्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहायक पोलीस आयुक्त साो गुन्हे १, डॉ. विशाल हिरे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार बौबे साो, मा. पोलीस सह आयुक्त, श्री, शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. सारंग आव्हाड, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १, डॉ. विशाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली गालगता गुन्हे विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00